मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Aug 30,2023


मातोश्री निवासस्थानी ममता बॅनर्जी यांचं संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी स्वागत केलं. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते.


ममता बॅनर्जी संध्याकाळी मातोश्रीवर दाखल झाल्या. त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना राखी बांधली


ममता बॅनर्जी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला श्रद्धांजली वाहिली


ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.


त्याआधी ममता बॅनर्जी यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यावर जात बच्चन कुटुंबियांची भेट घेतली तसंच त्यांना राखीही बांधली


मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ही बैठक होणार असून या बैठकीत सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story