ठाणेकरांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरा अन्यथा रोजच्या कामात अडथळा येईल.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत काटई नाका ते कल्याण फाटा या बारवी ग्रॅव्हिटी वाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीच काम हाती घेतल आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक 26 आणि 31 चा भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती आणि वागळे प्रभाग समितीत पाणीपुरवठा बंद असणार आहे.
वागळे प्रभाग समिती, नेहरूनगर तसंच कोलशेतमधील रूपादेवी पाडा, किसन नगर क्रमांक 2 या सर्व भागांमध्ये मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत खालचा गाव 24 तास पूर्णपणे बंद असणार आहे.
गुरुवार 1 फेब्रुवारी दुपारी 12.00 ते 2 फेब्रुवारी 12:00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे.
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.