चिकन सुईमुईपासून, प्रॉन्स, रोस्ट डकपर्यंत; हे आहे मुंबईतलं BEST चायनीज हॉटेल
मुंबईत अशा अस्सल चायनीज चवीचे पदार्थ खाण्याची संधी तुम्हाला मिळते ती म्हणजे लिंग्स पविलियन या हॉटेलमध्ये. कुलाबा येथे असणारं हे हॉटेल अनेकांच्याच Favorite List मध्ये.
चिकन, मटन, पोर्कपासून तयार करण्यात आलेले एक ना अनेक पदार्थ हॉटेलमध्ये सर्व्ह केले जातात.
शाकाहारींसाठीसुद्धा या हॉटेलमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे इथं साध्यासुध्या भेंडीलासुद्धा कमालीचा ट्विस्ट देत एखादा पदार्थ तयार केला जातो.
हॉटेलमध्ये प्रवेश केल्याक्षणीच तुम्हाला आपण एखाद्या लहानश्या चायना टाऊनमध्ये आलो आहो की काय, असं वाटतं. तिथं असणारे वेटर आणि इतर स्टाफही मोठ्या उत्साहात तुमचं स्वागत करताना दिसतात.
बेकन रॅप्ड प्रॉन्स, पॉट राईस वेगवेगळ्या प्रकारचे सूप आणि हनी ग्लेज्ड नूडल्स विथ आईस्क्रीम हे इथले सर्वाधिक आवडीचे पदार्थ.
कोळंबीपासून खेकड्यांपर्यंत इथं प्रत्येक पदार्थाला कमालीच्या चायनीज शैलीत तयार केलं जातं.
उत्तमोत्तम प्रकारचं साहित्य आणि तितक्याच उत्तम प्रकारची चव म्हणजे लिंग्स पविलियन. गेल्या अनेक वर्षांपासून इथं सातत्यानं येणाऱ्या खवैय्यांची संख्याही मोठी.
साहित्याचाच विषय निघाला आहे, तर एक लक्षात घेणं महत्त्वाचं की इथं येणारे मश्रूम सुकवलेल्या स्वरुपात थेट ईशान्य भारतातून येतात. ज्यानंतर ते विविध रुपात तुमच्यासमोर सर्व्ह केले जातात.