देशात शनिवारपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सावाला सुरुवात झालीय. आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेश मंदिरात भाविकांची गर्दी होतेय.
मुंबईत लालबागचा राजा प्रसिद्ध असून अनेक सेलिब्रेटी बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दोन-दोन दिवस रांगा लावून असतात.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1934 मध्ये झाली. दहा दिवसात राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात.
अनेक सेलिब्रेटी आणि भाविक राजाच्या चरणी भरभरुन दान करतात. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी 48,30,000 रुपयांचं दान जमा झालंय.
लालबागच्या राजाच्या चरणी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण करण्यात आला. या 20 किलो सोन्याच्या मुकुटाची किंमत तब्बल 16 कोटी रुपये इतकी आहे.
गेल्या दोन दिवसात लालबाग राजाच्या चरणी केंद्रीय मंत्री अमित शाह, शरद पवार, उद्धव ठाकरे, चंद्रकांत खैरे या राजकीय नेत्यांनी दर्शन घेतलं.
तर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रार्थना बेहरे हे सेलिब्रेटीही राजाच्या चरणी लीन झालेत.