श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (G.S.B.) मंडळ, किंग्ज सर्कल

मुंबईतील सर्वात जुनी आणि सर्वात प्रसिद्ध दहीहंडी कार्यक्रमांपैकी एक असलेली ही दहीहांडी पहायला प्रचंड गर्दी होते.

Sep 06,2023


भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणजेच जन्माष्टमी. महराष्ट्रासह भारतातही हा सण उत्साहात साजरा केला जातो. . त्यातच आता श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी मुंबई सुद्धा सज्ज झालीय. दही हांडी हा या उत्सवाचा खूप मोठा भाग आहे. तुम्ही जर मुंबईत असाल तर या 6 दहीहंड्या पाहायला चुकवू नका.

बाल गोपाल मित्र मंडळ, लालबाग

जन्माष्टमीच्या उत्साही उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळाचा दरवर्षी आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव पाहायलाच हवा.

जय जवान मित्र मंडळ, लोअर परळ

हे मंडळ मुंबईच्या मध्यभागी स्थित आहे आणि दहीहंडी कार्यक्रमासाठी इथे प्रचंड गर्दी होते.

राम कदमांची दहीहांडी, घाटकोपर

राम कदम यांची घाटकोपरमधल्या सॅनिटेरीयम लेन मधली दहीहांडी मुंबईतील एक मानाची हांडी आहे.

संघर्ष प्रतिष्ठान, ठाणे

संघर्ष ओपन हाऊस पांचपाखाडी इथला संघर्ष प्रतिष्ठानचा दहीहांडी उत्सव खूपच जोशात साजरा केला जातो.

टेंभीनाका, ठाणे

भवानी चौकातील दिघे साहेबांची हांडी ही मुंबईतील एक प्रतिष्ठित दहीहांडी आहे.

VIEW ALL

Read Next Story