Maharashtra SSC Result

Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाचे 10 महत्त्वाचे मुद्दे

Sayali Patil
Jun 02,2023

एकूण निकाल

यंदाच्या वर्षी दहावीचा एकूण निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे.

निकालाचा टक्का घटला दहावीच्या परीक्षेसाठी यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थी बसले होते.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालाची टक्केवारी 3.11 टक्क्यांनी घटली आहे.

परीक्षेला किती लिद्यार्थी बसले होते?

दहावीच्या परीक्षेसाठी यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थी बसले होते.

विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या

परीक्षेला यंदा बसणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींपैकी 95.87 मुली उत्तीर्ण झाल्या, तर 92.05 मुलं परीक्षा उत्तीर्ण झाली.

मुलींनी यंदाही बाजी मारली

राज्यातील एकूण निकालाच मुलींनी यंदाही बाजी मारली असून, मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण 3.82 टक्क्यांनी जास्त असल्याचं जाहीर करण्यात आलं.

100 टक्के निकाल

2022- 2023 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण विषयांपैकी 25 विषयांच्या निकाल 100 टक्के लागला.

कोकणाची बाजी

राज्यातून सर्वाधिक निकाल कोकण (98.11 टक्के) विभागाचा लागला, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (92.05 टक्के) लागला.

पुनर्परीक्षार्थी

दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या पुनर्परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण 60.90 टक्के

एसएससीचे निकाल आणि बरंच काही

परीक्षेला खासगी पद्धतीनं बसलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 74.25 टक्के आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचं प्रमाण 92.49 टक्के.

VIEW ALL

Read Next Story