राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने अजित पवार पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राजभवनात राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
राष्ट्रवादीचे दोन तृतीयांशहून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. त्यांनी पक्षावरही दावा ठोकला आहे.
केवळ पदवीपर्यंत शिकलेले अजित पवार राजकारणातील निष्णात खेळाडू आहेत.
अजित पवार यांचे मूळ गाव बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळी झाला. तिथेच त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले होते. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून अजित बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.
राजकीय कारकिर्दीसोबतच ते अनेकदा त्यांच्या भाषणामुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे एकूण 75 कोटी 48 लाखांची संपत्ती आहे.
2018-19 वर्षात अजित पवार यांचे एकूण उत्पन्न 62 कोटी 48 लाख इतके होते. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी यांच्या नावावर 51 कोटी 75 लाख किंमतीची जमीन आहे.
अजित पवार यांच्या नावे होंडा एकोर्ड, होंडा सीआरव्ही, टोयोटो कॅम्ब्रे या तीन कार आहेत. याशिवाय 2 ट्रॅक्टर, चार ट्रेलर आहेत. त्यांची एकूण किंमत सुमारे 89 लाख रुपये इतकी आहे.
अजित पवार यांच्याकडे 13 लाख 90 हजारांचे, तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 61 लाख 56 हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने आहेत. (सर्व फोटो - PTI)