महाराष्ट्रातील 'या ठिकाणांवर मिळतो जगात भारी वडापाव
मुंबईतील विले पार्लेतील हा मिक्स भाज्यांचा प्रसिद्ध वडापावचं ठिकाण आहे सम्राट वडापाव सेंटर.
मुंबईतील भाडूंपमधील फेमस वडापाव सेंटर 'भाऊ वडापाव' हा वाल्मिकी नगर या परिसरात मिळतो.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेतील प्रसिद्ध कुंजविहारचा वडापाव हा मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस मिठीबाई कॉलेजच्या समोर आनंद वडापाव नक्की एका खा वारंवार तिथे तुम्हाला जावंस वाटेल.
ठाणे स्टेशनच्या पश्चिमेस असलेलं चटणीसाठी लोकप्रिय असं हे गजानन वडापाव सेंटर नक्की एकदा भेट द्या.
भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आहे.
मुंबईतील मिठीबाई कॉलेज जवळील शिवाजी वडापावदेखील लोकप्रिय ठिकाण आहे. अनेक लोकांना या वडापावची चव खूप आवडते.
मुंबईतील गिरगावातील बोरकर वडापाव हा देखीलप्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावसोबत मिळणारी चटणी खवय्यांना जिभेचे चोचले पुरवते.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ गेल्या पंचवीस वर्षापासून खत्री बंधू यांची वडापावची हातगाडीवर खवय्ये मनसोक्त ताव मारतात.
पुण्यातील सर्वात सुप्रसिद्ध वडापाव म्हणून गार्डन वडापाव ओळखला जातो.
पुण्यात जोशी वडेवाल्यांचे वडे खाल्ले नाही असं फार क्वचितच घडत. पुण्यात अनेक ठिकाणी जोशी वडेवालेच्या ब्रँच आहेत.
अहमदनगरमधल्या संगमनेरमध्ये Naseeb Vadapav Center खूप प्रसिद्ध आहे. यूट्यूबवरही त्यांचे व्हिडीओ आहेत.
नाशिकमधील प्रसिद्ध असा उल्टा वडा पाव हा महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. हा नाशिकमधील सिडको, पवन नगरच्या ओम साई वडापाव सेंटरला मिळतो.
कर्जत स्टेशनवर एक्स्प्रेस थांबली की थांबली पहिला सुंगध येतो तो गरम गरम वडापावचा.
कोकणाकडे रस्ताने जाताना राम वाडी बस स्थानकाजवळ एक वडापाव सेंटर आहे. इथल्या वडापाव अतिशय प्रसिद्ध आहे.