महाविकास आघाडीची आज मुंबईतील बीकेसी येथे सभा पार पडली. या सभेतून राहुल गांधी यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या.
महालक्ष्मी योजनेतून प्रत्येक महिन्याला महिलांना 3 हजार रुपये देणार.
संपूर्ण महाराष्ट्रात महिलांना आणि मुलींना मोफत बस प्रवास सुरु करणार.
25 लाख रुपयांचा कुटुंब आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषधे दिली जाणार.
शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेणार.
त्याच बरोबर सुशिक्षित तरुण बेरोजगारांना प्रतिमहिना 4 हजार रुपये देणार.
त्यासोबत राज्यात जात निहाय जनगणना करणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले.