हाडांच्या मजबुतीसाठी बिनसाखरेचे पौष्टिक लाडू, थंडीत दररोज खा हे लाडू!
थंडी आली ही सांधेदुखीने हैराण होतो. अशावेळी ही लाडून बनवून ठेवाच
ओले खजूर, तूप,बदाम,काजू, अक्रोड,मखाना 1 कप, किसलेल सुक खोबरं, मनुके, कलिंगडाच्या बिया,खसखस, पिस्ता
सर्वप्रथम एका कढाईत एक ते दोन टीस्पून तूप घ्या. नंतर या तुपात सर्व ड्रायफ्रुट्स चांगले भाजून घ्या.
पुन्हा एकदा तूप घेऊन त्यात खजूर चांगले भाजून घ्या. त्याआधी खजुराच्या सर्व बिया काढून घ्या
आता हे सर्व ड्रायफ्रुट्स चांगले बारीक करुन घ्या. नंतर खजूर आणि हे ड्रायफ्रुट्स एकत्र करा
आता हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि त्याचे लाडू वळवून घ्या