जसजशी थंडीची चाहूल लागत आहे, मद्यप्रेमींमध्ये रमची चर्चा सुरु झाली आहे.

Oct 18,2023

थंडीत अनेक मद्यप्रेमी तुम्हाला रम पिण्याचा सल्ला देताना दिसतील.

थंडीत रम प्यायल्याने शरिरात गरमी राहते असा दावा केला जातो. तसंच उन्हाळ्यात नुकसान होण्याची शक्यता आहे सांगत अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

या दाव्यात नेमकं काय तथ्य आहे, जाणून घ्या...

वाइन क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ सांगतात की, उन्हाळ्यात रम पिऊ नये यामध्ये कोणतंही तथ्य नाही.

रम सर्वात आधी कॅरेबियन बेट वेस्टइंडिजमध्ये तयार करण्यात आली होती.

वेस्टइंडिजसह प्रचंड उष्णता असणाऱ्या क्यूबा, जमैका, भारतासह अनेक आशियाई देशात वर्षभर रम प्यायली जाते.

जर उष्णतेत रमी प्यायल्याने नुकसान झालं असतं, तर वेस्टइंडिजसारख्या गरम देशात ती इतकी प्रसिद्ध झाली नसती.

त्यामुळे उष्णता असताना रम प्यायल्याने नुकसान होतं यामध्ये कोणतंही तथ्य नाही.

ही माहिती फूड अँण्ड वाइन एक्स्पर्टच्या हवाल्याने देण्यात आली आहे. यातून मद्यसेवनाला पाठिंबा देण्याचा हेतू नाही.

VIEW ALL

Read Next Story