मुलांसोपत झोपणे हे अनेक पालकांचसाठी दिनक्रमातील एक भाग आहे. मुलांसाठी देखील ही सुरक्षित भावना आहे.
पण मुलांसोबत पालकांनी कोणत्या वयापर्यंत झोपावे? या प्रश्नाचं ठोस असं उत्तर नाही. कारण या गोष्टी अनेक फॅक्टर्सवर अवलंबून आहेत. जसं की, मुलाचा स्वभाव, पालकांची सहजता आणि कौटुंबिक संस्कृती
अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, मुलांना 2-3 वर्षांपर्यंत पालकांसोबत झोपवावे. नंतर मात्र वेगळं झोपण्याची सवय लावावी. कारण समजून घ्या?
मुलं जशी मोठी होतात. तसे ते आपल्या स्वातंत्र्य आणि एकातांची अपेक्षा करतात. त्यांना एकट्याला आपल्या बिछान्यावर झोपायचे असते.
मुलांचा सामाजिक विकास होण्यासाठी त्यांना एकट्याला झोपायला लावणे आवश्यक ठरते.
मुलांसोबत कायम झोपल्यामुळे पालकांच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो.
मुलांसोबत बराच काळ झोपणे योग्य नाही. त्यामुळे पालकांनीच हा निर्णय घ्यावा. तसेच मुलांची सोय पाहता हा निर्णय घ्यावा.
तुम्ही मुलांना वेगळं झोपवण्याचा विचार करत असाल तर हळहळू हे बदल स्वीकारा. झोपण्याचे एक शेड्युल तयार करा.