कच्ची पपई आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. पिकलेल्या पपईपेक्षा कच्च्या पपईचे खूप सारे फायदे आहेत.
कच्ची पपईला सुपरफुडदेखील म्हटले जाते. त्यामुळं आत्ताच तुमच्या डाएटमध्ये सामील करा
कच्चा पपईत आढळणाऱ्या एजाइममुळं पाचनसंस्था सुरळीत राहते. त्याचबरोबर बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते
कच्च्या पपईत व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळं याला नॅचरल इम्यूव बुस्टरदेखील म्हटले जाते
कच्च्या पपईत अँटी- इंफ्लेमेटरी गुण आढळतात. जे शरीरातील जळजळ आणि क्रॉनिक डिसीजचा धोका कमी करण्यास मदत होते
कच्च्या पपईत फायबर, पोटॅशियमची मात्रा मोठ्याप्रमाणात आढळते. ज्यामुळं कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.
कच्च्या पपईत असलेल्या फायबरमुळं ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)