अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारीला केली जाणार आहे. गर्भगृहात मूर्तीची स्थापना करण्यात आली.
मूर्तीच्या वरच्या बाजूस ॐ, गणेश, चक्र, कमलनयन, शंख, गदा, स्वस्तिक अशी चिन्हे वरती कोरण्यात आली आहे.
वामन, नृसिंह, वराह, कर्म, मत्स्य ही श्रीरामाचे अवतार रामलल्लाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला आहेत.
रामलल्लाच्या मूर्तीवरील डाव्या बाजूस इतर पाच अवतार कोरण्यात आले आहेत. यामध्ये परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्कि यांचा समावेश आहे.