झटपट तयार होते कैरीची चटपटीत चटणी; रेसिपी एकदम सोपी

Mar 28,2024

मध्यम आकाराच्या दोन कैऱ्या स्वच्छ धुऊन घ्या.

कैरीचे बारीक बारीक तुकडे करा.

लसणाच्या चार-पाच पाकळ्या थोडसं किसलेलं ओलं खोबरं दोन-चार हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ एवढे साहित्य लागणार आहे.

कैरीसह लसून पाकळ्या, मिरच्या किसलेलं ओलं खोबरं सर्व मिश्रण एकत्र मिक्समध्ये वाटून घ्या. यात थोडसं मीठ घाला.

चटपटीत कैरीची चटणी तयार आहे. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत कैरीची चटणी तयार होते.

व्यवस्थित हवा बंद डब्यात भरुन ठेवल्यास कैरीची चटणी तीन ते चार दिवस टिकते.

VIEW ALL

Read Next Story