मुलांचं योग्य संगोपन आणि त्याच्यावर केले जाणारे संस्कार याविषयी पालकांमध्ये कायमच सजगता पाहायला मिळते. कारण इथूनच त्यांचं भविष्य निर्धारित होत असतं.
अनावधानानं किंवा अनेकदा राग अनावर होताच पालकांच्या तोंडून मुलांना उद्देशून काही असे शब्द उच्चारले जातात ज्याचा मुलांव अतिशय वाईट परिणाम होतो.
तुमच्यामुळं कायमच अडचणी येतात असं म्हटल्यास यामुळं मुलांचा आत्मविश्वास कोलमडतो. मुलं हसणं- बागडणं विसरून एकाकीपणाच्या छायेत जातात.
तुझ्याच्यानं कधीच काही होणार नाही, असं म्हटल्यास चुका करायला आणि पर्यायी प्रयत्न करायलाही मुलं घाबरतात.
भावंडांकडून काहीतरी शिक, असं सतत मुलांना म्हटल्यास त्यांच्या मनावर याचा वाईट परिणाम होतो. मुलांच्या मनात घृणेची भावना निर्माण होते.
मुलांना सतत तुच्छतेनं वागवल्यास त्यांच्या मनात प्रचंड राग धुमसतो आणि अनेकदा हा राग चुकीच्या प्रसंगी बाहेर पडतो आणि त्यावर ताबा ठेवणं कठीण होऊन जातं.
पालकांनी त्यांच्या चुकांसाठीसुद्धा मुलांना दोष देऊ नये. असं केल्यास मुलांचा पालकांवर असणारा विश्वास डगमगतो आणि त्यांच्या मनात भीती घर करते. (छाया सौजन्य- फ्रीपिक/ वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.) ()