मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी कायमच चर्चेत असतात. आपल्या साधेपणासोबतच खास व्यक्तीमत्वामुळे ओळखल्या जातात.
जया किशोरी देश-विदेशातही प्रसिद्ध आहेत. मात्र तुम्हाला त्यांचं खरं नाव माहित आहे का?
राजस्थानमधील एक छोटंस गाव सुजानगढ येथे जया किशोरी यांचा जन्म झाला आहे. ब्राम्हण कुटुंबातील जया किशोरी.
लहानपणी आपल्या आजोबांकडून त्या कथा आणि गोष्टी ऐकत असतं.
वयाच्या अवघ्या 6 ते 7 वर्षांतच त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरु झाला.
अवघ्या वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी लिंगाष्टकम, शिव तांडव स्त्रोत, मधुराष्टकम्रा, शिवपंचाक्षर स्त्रोत्रम, दारिद्र्य दहन शिव स्त्रोत्र पाठ केले होते.
जया किशोरी यांनी स्वतः एका मुलाखतीत आपल्या खऱ्या नावाचा खुलासा केलाय. कसं पडलं जया किशोरी हे नाव?
जया किशोरी यांच खरं नाव 'जया शर्मा' असं आहे. हे नाव त्यांना आजीने दिले होते.
त्यांचे गुरु गोविंद राम मिश्रा यांनी त्यांना 'किशोरी' ही पदवी दिली होती. त्यानंतर जया शर्मा यांचं नाव जया किशोरी असं झालं.