केसांमुळे सौंदर्य वाढते हे आपल्याला माहित आहेच. पण त्यांच सौंदर्य टिकवण्यासाठी योग्य निगा राखणे आवश्यक असते.
बदलत्या हवामानाप्रमाणे केसांची काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात केसांवर आणि डोक्याच्या त्वचेवर परिणाम होत असतो.
पावसाळ्यात केस तेलकट होणे, केसांमध्ये कोंडा होणे यांपासून सरंक्षण करण्यासाठी तुम्ही खालील उपाय करु शकता.
केस धुवायच्या 15 मिनिटे आधी खोबरेल तेल लावा. यामुळे तुमचे केस प्री-कंडिशनिंग होण्यास मदत होते.खोबरेल तेल पाणी कमी खेचून घेते ज्यामुळे टाळूचा कोरडेपणाही कमी होतो.
केस निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार देखील तेवढाच महत्वाचा असतो. आहारामध्ये अंडी, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य, हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
केस ओले होऊ नयेत म्हणून वर बांधून ठेवा. यामुळे टाळूला खाज सुटणे आणि बॅक्टेरियापासून संरक्षण होण्यास मदत होईल.
पावसाच्या पाण्यामध्ये केस ओले करू नका. जर केस ओले झाले असतीलच तर केस कोरडे करण्यासाठी मऊ टॉवेलचा वापर करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)