मुलं, बाळंत महिला, तरुण, सर्वांसाठीच गुणकारी मराठमोळा 'डिखाडा'

Mansi kshirsagar
Jul 12,2024


मुलं कधी कधी दूध पिण्यास टाळाटाळ करतात


अशावेळी मुलांना दुधात हॉर्लिक्स किंवा बॉर्नव्हिटा टाकून दिलं जातं. मात्र, यापेक्षा तुम्ही घरातही पौष्टिक पदार्थ बनवून मुलांना देऊ शकता.


डिखाडा (डिंकवडा) हा पदार्थ मराठवाड्यात खूप लोकप्रिय आहे. दुधात ही पौष्टिक पावडर टाकून प्यायला दिली जाते


ही पौष्टिक पावडर कशी बनवायची याची सोप्पी रेसिपी जाणून घ्या

साहित्य

सुकं खोबरं, मखाणा, डिंक, बदाम, काजू, खारीक, गुळ

कृती

सर्वात पहिले सुकं खोबर किसून घ्या, त्यानंतर खारीक, काजू, बदाम बारीक कापून घ्या. डिंकदेखील तळून घ्या


हे सर्व साहित्य आता मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. किंवा डंकावरदेखील दळून आणू शकतो


बाळंतीण महिला, लहान मुलं यांसाठी डिखाडा खूपच उपयुक्त आहे.

VIEW ALL

Read Next Story