आपल्या घरात अनेकदा भिंतीवर पाली दिसतात. बरेचजण त्यांना बघून घाबरतात.
मात्र, घरात दिसणाऱ्या पाली या खरंच घातक आणि विषारी असतात का? जाणून घ्या, यासंबंधीची माहिती.
खरंतर, घरात दिसणाऱ्या पालींना घराबाहेर काढणे हे खूप अवघड काम असते.
परंतु, पालींना घरात राहू देणे घातक नव्हे तर काही दृष्टीने ते फायदेशीर असते.
घरातील पाली डास, माश्या, झुरळ तसेच इतर प्रकारच्या किटकांची संख्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
अनेकांच्या घरात खास करुन पावसाळ्यात घरात बरेच किटक येत असतात. त्यामुळे घरात किटकांची संख्या वाढते.
घरात आढळणाऱ्या पालींच्या शरीरात कोणत्याच प्रकारचे विष नसते.
मात्र, जर पाल चुकून स्वयंपाकघरातील जेवणात पडली किंवा त्याच्या आसपास फिरकली तर संपूर्ण जेवण खराब होते.
जर तुमच्या घरातून पालींना बाहेर काढायचे असेल तर पाली असलेल्या ठिकाणाच्या आसपास तुम्ही कांदा किंवा लसणाच्या पाकळ्या ठेवू शकता.