योग्य वेळी- योग्य व्यक्तीशी लग्न करणे हे अत्यंत फायदेशीर असते, यात काहीच शंका नाही. पण योग्य व्यक्तीशी उशिराने लग्न केल्यासही अनेक नुकसान होऊ शकतात.
उशिरा लग्न केल्यामुळे खूप ऍडजस्टमेंट करण्याची वेळ येते. खूप वर्षे एकटे किंवा पालकांसोबत राहिल्यामुळे लग्नानंतर जुळवून घेणे कठीण होते.
तिशीनंतर महिलांची फर्टिलिटी की होते. अशावेळी तुम्हील उशिरा लग्न केल्याने फॅमिली प्लानिंग करताना त्रास होऊ शकतो.
30-35 पर्यंत व्यक्ती नव-नवीन गोष्टी एक्सप्लोर करत असतो. अशावेळी जेव्हा उशिरा लग्न होते तेव्हा पार्टनरसोबत काही खास करण्यासारख राहत नाही.
इंटीमेट एक्सपीरीयन्स फार चांगला नसतो. कारण या वयात हार्मोन्स सुस्त होतात. त्यामध्ये फार बदल होत नाहीत.
उशिरा लग्न केल्यामुळे जोडीदारामध्ये फार कमी ऑप्शन्स उपलब्ध होतात. अशावेळी जोडीदारामध्ये तडजोड करावी लागते. अनेकदा जबरदस्ती जोडीदार निवडावा लागतो.
उशिरा लग्न केल्याने मुलांमध्ये आणि पालकांमध्ये खूप मोठा जनरेशन गॅप असतो. यामुळे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये अनेक ता-तणाव पाहायला मिळतात. तसेच त्यांच योग्य पद्धतीने पालन-पोषण होत नाही.
नवरा-बायकोचं नातं हे प्रॅक्टिकल आणि इमोशनल अशा दोन्ही पातळीवर असणे गरजेचे आहे. पण जर लग्न उशिरा झालं तर भावनिक गुंतागुंत कमी असते.
उशिरा लग्न केल्यावर त्यामध्ये घटस्फोटाची शक्यता अधिक असते. कारण तिशीनंतर लोकं करिअरचा सर्वाधिक विचार करतात. त्यामुळे ते इतरांना फार कमी वेळ देतात.