किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. यापैकी काही मसाले आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतात.
यापैकीच एक मसाला म्हणजे 'लवंग'. लवंगाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात.
रात्री झोपण्यापूर्वी 2 लवंगांचे सेवन केल्याने आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.
लवंगामध्ये फायबर, अँटी इंफ्लेमेटरी, अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी ऑक्सिडंट्स सारखे गुण असतात.
रात्री झोपण्यापूर्वी 2 लवंगांचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत मिळते.
काही लोकांना सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास होतो. अशा लोकांनी रात्री कोमट पाण्यासोबत लवंगाचे सेवन केल्याने समस्या दूर होऊ शकते.
पोटदुखीचा त्रास होणाऱ्या लोकांनी रात्री कोमट पाण्यासोबत लवंगाचे सेवन केल्याने फायदा मिळतो आणि समस्या दूर होऊ शकते.
रात्री झोपण्यापूर्वी लवंगाचे सेवन केल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)