एसीच्या बाहेरील युनिटवर साचलेली धूळ आणि घाण स्वच्छ पाण्याने आणि मऊ ब्रशने साफ करावी.
एसीच्या पंख्यांमध्ये कोणताही अडथळा नाही याची खात्री करा.
इनडोर युनिटच्या फिल्टरवर धूळ जमा होऊ शकते. ते पुसून किंवा धुवून स्वच्छ करा.
तुम्ही आवश्यक असल्यास एअर कंडिशनर क्लिनर वापरू शकता किंवा फिल्टर बदलू शकता.
ड्रेनेज पाईपमध्ये अडथळा आहे का ते तपासा. घाण साचली असेल तर त्वरित बदला.
जर पाईप ब्लॉक झाला असेल तर पाणी बाहेर पडू शकणार नाही, त्यामुळे एसीमध्ये समस्या होऊ शकते.
दरवर्षी एसीची सर्व्हिसिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे एसीची कार्यक्षमता सुधारते.
चांगल्या तंत्रज्ञांकडून एसी तपासणी करा. तंत्रज्ञ तुमच्या एसीची तपासणी करुन समस्यांना दूर करतील.
स्वच्छ आणि व्यवस्थित काळजी घेतलेली एसी कमी वीज वापरते, त्यामुळे तुमची वीज बचतही होईल.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)