मोदक करताना कळ्या तुटतात; आकार बिघडतो, ही एक टिप लक्षात ठेवा

Mansi kshirsagar
Aug 29,2024


गणेशोत्सव अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे.


बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करताना बाप्पाच्या नैवेद्याचीही खास काळजी घेतली जाते


बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. पहिल्यांदाच मोदक बनवणाऱ्यांसाठी या टिप्स


मोदक करताना त्याला कळ्या पाडणे हे खूप कठिण काम मानले जाते


अनेकांना कळ्या पाडणे जमत नाही किंवा कळ्या तुटतात अशावेळी हि टिप लक्षात ठेवा


मोदकाला कळ्या पाडत असताना सारणाला अंगठ्याने पकडून ठेवे जेणेकरुन कळ्या एकसारख्याच पडतील.


तसंच, कळ्या पाडून झाल्यानंतर दोन्ही हाताने अलगद गोलगोल फिरवा


मोदकाचे टोक काढून झाल्यानंतर कळ्यांना चमच्याच्या खालचे टोक फिरवून घ्या

VIEW ALL

Read Next Story