तुमच्या सासूशी संवाद साधा, त्यांच्या आवडीनिवडी विचारा आणि त्यानुसार गोष्टी प्लॅन करा.
तुमच्या पतीचा आदर करा आणि हे तुम्हाला तुमच्या सासू आणि पती दोघांच्याही जवळ आणेल.
विविध विषयांवर सासू-सासऱ्यांचा सल्ला घ्या. आपल्या योजना आणि निर्णय सासूसोबत शेयर करा, तिच्या हृदयात स्वतःसाठी एक विशेष स्थान निर्माण करा.
शिवाय विशेष नात निर्माण करण्यासाठी तुमचे दिवसभरातले अनुभव आणि विचार सासूसोबत शेअर करा.
तुमच्या कौटुंबिक जीवनात काय होतयं, हे तुमच्या आईसोबत शेअर करा, पण ते देखील जास्त करू नका याची काळजी घ्या.
नेहमी आपल्या सासूशी आपल्या आईशी तुलना करू नका. आपल्या आईचा प्रभाव लादण्यापेक्षा आपल्या सासूचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा.
आपल्या आईबद्दल सतत बोलणे किंवा तिचा सल्ला घेणे टाळा. आईची स्टाईल लादण्यापेक्षा सासूचे म्हणणे आणि तिचा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांचे कौतुक करा. (All Photo Credit : Freepik)(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)