कोबीच्या भाजीचा स्वयंपाक घरात विविध पदार्थ बनवण्यासाठी वापर केला जातो. कोबीमध्ये अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स देखील असतात.
हिरव्या रंगाच्या कोबीची भाजी अनेक लोकांच्या घरामध्ये बनते. परंतु तुम्हाला माहितीये का की जांभळ्या रंगाची कोबी सुद्धा असते.
जांभळ्या रंगाच्या कोबीचा वापर फ्राईड राईस, पास्ता, सॅलेड, सूप इत्यादींमध्ये केला जातो.
दोन्ही कोबीमध्ये फोलेट, थायमिन, नियासिन, कॅल्शियम, बी6, व्हिटॅमिन सी, तांबे, लोह, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात, परंतु जांभळ्या कोबीमध्ये काही पोषक घटकांचे प्रमाण जास्त असते.
जांभळ्या कोबी ही हिरव्या कोबीपेक्षा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते.
जांभळ्या कोबीच्या सेवनाने हृदय निरोगी राहते, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास फायदेशीर ठरते. यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्सचे असतात.
जांभळ्या रंगाच्या कोबीमध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आढळते. शिवाय यात ल्यूटिन आणि ज़ेक्सेंथिन नावाचे कंपाउंड असते ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.
जांभळ्या रंगाची कोबी व्हिटॅमिन ए ऐवजी ई, सी आणि बी कॉम्प्लेक्सने भरपूर आहे. याच्या सेवनाने त्वचा हेल्दी आणि चमकदार होते.
जांभळ्या रंगाच्या कोबीच्या सेवनाने वेट लॉस, मजबूत हाडं, चांगली पचनशक्ती, इम्यूनिटी बूस्ट, ब्लड शुगर कंट्रोल या सारखे फायदे शरीराला मिळतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)