धावणे किंवा सायकल चालवल्यामुळे शारीरिक हालचाली मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो आणि अतिविचार मनात येत नाही.
सततच्या अभ्यासामुळे मेंदूला जास्त प्रमाणात थकवा जाणवतो. हिरव्या पालेभाज्या, फळं , सुका मेवा यांमुळे मेंदूला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते.
सतत तासन् तास अभ्यास केल्याने पाठीच्या आणि डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे अधून मधून एक दोन मिनीटांचा ब्रेक घेतल्यानं ताण कमी होण्यास मदत होते.
मुलांमध्ये सकारात्मक विचार निर्माण करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो व नैराश्य येत नाही.
मित्रांसोबत मजा-मस्ती करणं किंवा फॅमिलीसोबत फिरायला जाणं यामुळे मुलं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहतात.
रोज सकाळी ध्यान करण्याची सवयीमुळे मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळे मानसिक तणाव दूर होतात.
छंद जोपासण्यास पालकांनी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. खेळ, चित्रकला , डान्स , गाणी ऐकणं यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहते.