पावसाळ्यात चायनीज, मोमो खाण्याची इच्छा होते. शेजवान चटणी शिवाय तयार करणे अशक्य आहे.
अनेक डिशेस तयार करण्यासाठी वापरली जाणारी शेजवान चटणी घरी देखील तयार करु शकता.
बेडगी किंवा काश्मिरी मिर्ची, आलं, लसूण, मीठ, सोया सॉस, व्हिनेगर आणि तेल इतकं साहित्या तुम्हाला लागणार आहे.
सर्व प्रथम मिरच्या 5 मिनीट पाण्यात भिजत ठेवा. यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन भिजवलेल्या मिरच्या त्यात एक ते दोन मिनीट उकळून घ्या.
उकळलेल्या मिरच्या काढून पाणी फेकून द्या. यानंतर या मिरच्या थोड्या स्मॅश करा.
एका पॅनमध्ये तेल घेवून त्यात बारीक चिरलेला लसूण तसेच आलं चांगलं परतून घ्या. यात स्मॅश केलेल्या मिरच्या घालून हे सर्व मिश्रण दोन मिनीट चांगले परता.
या परतलेल्या मिरची आणि आल, लसून याच्या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला. यानंतर यात चमचाभर व्हिनेगर आणि सोया सॉस घाला. ऑप्शन म्हणून टोमेटो सॉस देखील टाकू शकता. शेजवान चटणी तयार आहे.
तयार शेजवान चटणी काचेच्या बरणीत भरुन ठेवा. ही चटणी महिनाभर टिकते.