हिवाळ्याच्या सिजनमध्ये त्वचा कोरडी पडणे ही सामान्य गोष्ट आहे. वातावरणातील आर्द्रता कमी होते ज्यामुळे त्वचा कोरडी पडते.
कोरड्या त्वचेवर तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करू शकता.
हिवाळ्यात त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझ करण्यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर वापरा. यामुळे त्वचा मऊ राहते आणि कोरडेपणा दूर होतो.
हिवाळ्यात अनेकजण खूप गरम पाण्याने आंघोळ करतात, परंतु यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे अंघोळीसाठी कोमट पाणी वापरा.
जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल किंवा शिया बटर यांसारखे नैसर्गिक तेल त्वचेला लावा. वापरू शकता. हे कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात.
हायड्रेटेड राहणे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप महत्त्वाचे आहे. त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)