सगळ्यात आधी मूग स्वच्छ करून घ्या, त्यानंतर मूग भाजून घ्या आणि ठंड होण्यासाठी ठेवा.
मूग थंडे झाल्यानंतर त्यांची मिक्समध्ये पावडर करून घ्या.
आता एका कढईत साजूक तूप घालून त्यात ड्रायफ्रुट्स चांगले भाजून घ्या आणि त्यांना ठंड करण्यासाठी ठेवा.
त्यानंतर त्याच कढईत 2-3 चमचा तूप घाला आणि त्यानंतर ही पावडर 10 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्या.
पावडर भाजून झाल्यावर त्यात गुळाची पावडर घाला. गुळ आणि मूगाची पावडर एकत्र चांगली मिक्स झाल्यानं त्यात ड्रायफ्रुट्स टाका.
हे सगळं थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे लाडू बनवा. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)