चपाती मऊ होण्यासाठी काय करावं? 'या' टिप्स तुम्हाला बनवतील अन्नपूर्णा


तुम्हाला चपाती मऊ बनवण्याचे टिप्स जाणून घ्यायचे असेल तर पुढील टिप्स फॉलो करा.


जेव्हा जेव्हा तुम्ही चपातीसाठी पीठ मळून घ्याल तेव्हा चाळणीतून पीठ चाळून घ्या. जर चपातीमध्ये कोंडा किंवा भुसा जास्त असेल तर चपाती देखील कोरडी होऊ शकते.


पीठ मळून घेताना नेहमी कोमट पाणी वापरा. जर तुम्ही खोलीच्या तापमानाचे पाणी वापरत असाल तर पीठ जास्त वेळ मळून घ्या, अशा प्रकारे चपाती मऊ राहील.


पीठ मळून घेण्यापूर्वी त्यात चिमूटभर मीठ घालावे. त्यामुळे चपातीची चवही चांगली येईल आणि चपाती मऊ होतील.


पीठ मळून घेतल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवा. 5 मिनिटांनंतर पुन्हा एकदा ओल्या हाताने पीठ मळून घ्या आणि नंतर चपाती लाटून घ्या.


जर तुम्हाला तुमच्या चपाती जास्त काळ चविष्ट आणि मऊ ठेवायच्या असतील तर पीठ ताक, दही किंवा दूध घालून मळून घ्या. यामुळे चपाती खूप मऊ होतील.

VIEW ALL

Read Next Story