Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यावर शोभून दिसतील 'हे' नवे ब्लाऊज पॅटर्न्स, बघा डिझाइन्स

तेजश्री गायकवाड
Jan 13,2025


वर्षातील पहिला सण अर्थात मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी साजरा केला जात आहे.


या सणाला आवर्जून काळी साडी नेसली जाते. या साडीवर ट्रेंडी ब्लाऊज हवे असतील तर आम्ही तुमच्यासाठी पॅटर्न्स घेऊन आलो आहोत.

बोट नेकलाईन

बोट नेकलाईनचा ब्लाऊज अगदी कोणत्याही साडीवर शोभून दिसेल. ही स्टाईल आवर्जून ट्राय करा.

चौकोनी नेकलाईन

तुम्ही रेगुलर गोलाकार नेकलाईनसोडून छान चौकोनी नेकलाईनचा ब्लाऊज घालू शकता.

मल्टीकलर ब्लाऊज

काळ्या साडीवर सुंदर मल्टीकलर ब्लाऊज खूप उठून दिसेल आणि तुम्हाला हटके लूक देईल.

हाय कॉलर ब्लाऊज

जर तुम्हाला जास्त स्किन दिसलेली आवडत नसेल तर तुम्ही हाय कॉलर ब्लाऊज घालू शकता.

डिझायनर नेट ब्लाऊज

तुम्ही प्लेन साडी नेसणार असाल तर तुम्ही डिझायनर नेट ब्लाऊज घालू शकता. हा ब्लाऊज हटके लूक देईल.

स्लिव्हलेस ब्लाऊज

स्लिव्हलेस ब्लाऊज हा एक उत्तम पर्याय आहे. काटा पदराच्या साडीवर हा ब्लाऊज छान दिसेल.

VIEW ALL

Read Next Story