कापूरचे अनेक फायदे असून याला जर अंघोळीच्या पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ केली तर त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
कापूरच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे स्ट्रेस, थकवा दूर होतो आणि मन शांत होतं.
कापूरमध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे शरीराला फायदेशीर ठरतात.
कापूरमधील अँटी बॅक्टेरियल गुण हे त्वचेवरील दाणे, इचिंग आणि रॅशेजपासून बचाव करतात.
कापूरचा सुगंध हा मेंदूला रिलॅक्स करतो आणि तणाव कमी करतो.
कापूरच्या पाण्याने अंघोळ केल्याने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
अंघोळीच्या पाण्यात कापूर टाकल्याने डोके दुखी किंवा शरीराच्या इतर वेदना दूर होतात. तुम्ही पाण्यात 2 ते 3 कापूरच्या गोळ्या मिसळू शकता.
अंघोळीच्या पाण्यात कपूर मिक्स केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)