अनेकदा बाल्दी, बालदी, बालटी, बालदी हे असे शब्द बोलले जातात आणि त्यातला योग्य शब्द कोणता हेच लक्षात येत नाही.
'बॅल्दे' या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ होतो पाणी भरण्यासाठीची चामड्याची पिशवी. याच शब्दावरून हिंदीत आला 'बाल्टी'.
हिंदीतील याच बाल्टी शब्दाचं मराठीकरण किंवा मराठीत विपर्यास होऊन झाला 'बालदी'.
कैकजण याच बालदीला कायमच 'बादली' असं म्हणतात. तर हा योग्य शब्द नसून, तो जनमानसात रुढ झालेला शब्द आहे.
मात्र शब्दकोषातही 'बालदी' याच शब्दाचा उल्लेख आहे.
कथेचा सार असा, की 'बालदी' हा शब्द अगदी योग्य शब्द आहे. (माहिती सौजन्य- खलबत्ता)