वास्तूशास्त्रानुसार सूर्यास्थ झाल्यावर काही गोष्टींचं दान करणं टाळायला हवं.
वास्तूशास्त्रानुसार अशी चूक केल्यास यामुळे नुकसान सहन करावं लागू शकत.
वास्तूशास्त्रानुसार रात्र झाल्यावर दुधाचं दान करणं टाळावं. कारण यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
दुधाचा संबंच हा चंद्रासह सूर्यासोबत सुद्धा असतो. रात्री दुधाचं दान अशुभ ठरू शकतं. यामुळे घराच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.
वास्तूशास्त्रानुसार दुधासह त्यापासून बनवलेले दही सुद्धा रात्री दान करणं टाळायला हवं.
दह्याला शुक्रचं प्रतीक मानलं जातं जे सुख आणि वैभव दोन्ही देते. त्यामुळे रात्री दहीचं दान करू नये असं म्हटले जाते.
असं म्हटले जाते की सूर्यास्तानंतर दह्याचं दान केल्यावर संकट तुम्हाला चारही बाजुंनी घेरतात.
रात्रीच्यावेळी मीठ दान म्हणून देणं सुद्धा चुकीचं मानलं जातं. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)