तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात अमीनो अॅसिड असते. त्यामुळे केसांना निरागी ठेवण्यासाठी तांदळाचे पाणी रामबाण उपाय मानले जाते.
केसांच्या गळतीपासून बचावासाठी पहिला उपाय म्हणजे तांदूळ आणि नारळाचे मिश्रण. दोन कप तांदळाच्या पाण्यात एक कप नारळाचं तेल नीट मिसळून केसांना लावा. एका तासानंतर केस स्वच्छ धुवून घ्या.
केसांच्या योग्य वाढीसाठी तांदळाचे पाणी आणि अॅलोवेराचा हेअर मास्क जेल एक चांगला पर्याय आहे. हे मास्क बनवण्यासाठी दोन कप तांदळाचे पाणी आणि एक कप अॅलोवेरा जेल मिक्स करून केसांना लावा. 30 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा.
केसांसाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा स्प्रे देखील वापरू शकता. हा स्प्रे तयार करण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. तांदुळ पाण्यात भिजत घाला. 24 तासांनंतर हा स्प्रे एका हवाबंद बाटलीत भरा आणि वापर करा.
मेथी आणि तांदळाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने हेअर मास्क बनवून वापरणे देखील फायदेशीर ठरेल. यासाठी दोन कप तांदळाचे पाणी आणि 2 कप मेथी घ्या. याची पेस्ट तयार करून लावा. 30 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.
गुलाबाचे पाणी केसांना मुळांपासून मजबूत बनवते. त्यामुळे एक कप तांदळाच्या पाण्यामध्ये दोन चमचे गुलाबाचे पाणी मिक्स करून केसांना लावा. 30 मिनिटांनंतर हलक्या हातांनी केस धुवा.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)