अनेकदा आपण दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. दात योग्यरित्या स्वच्छ न केल्याने दात पिवळे होण्याची समस्या वाढते.
दातांमध्ये जमलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत. सकाळी रिकाम्या पोटी हिरवी पाने चघळल्याने चांगलाच फायदा मिळतो.
सकाळी उपाशीपोटी पेरुची पाने चावल्याने दात पांढरे आणि स्वच्छ होण्यासाठी मदत होते.
सकाळी कडुलिंबाची पाने चावल्याने दात स्वच्छ होतात आणि तोंडातील बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होते.
दात पिवळे दिसत असल्यास ते पांढरे करण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जाऊ शकतो.
सकाळी उपाशीपोटी पुदीन्याची पाने चावल्याने पिवळ्या दातांची समस्या दूर होऊ शकते.
संत्र्यांचे सालदेखील दातांवर घासल्याने दात पांढरे होण्यास फायद्याचे ठरते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)