Women's day 2024 : मैत्रिणींनो भारतातील 'ही' ठिकाणं तुम्हाला फिरण्यासाठी बेस्ट
देशातील महिलाच्या भटकंतीसाठी सुरक्षित ठिकाणाच्या शोधात असाल तर, सिक्कीम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. देशाच्या उत्तर पूर्वेला हे ठिकाण तुमची वाट पाहतंय.
पुदुच्चेरी अर्थाच पाँडीचेरी हे ठिकाण तिथं असणाऱ्या शांततेसोबत सुरेख समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथं येऊन तुम्हाला ऑरोविल, मातृमंदिर, सेरेनिटी बीच, व्हाइट टाउन, फ्रांसीसी युद्ध स्मारक, बॉटनिकल गार्डन पाहता येईल.
एखाद्या ऐतिहासिक वारसाप्राप्त ठिकाणाला भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही एकट्यानं किंवा खास मैत्रिणीसह हंपी गाठू शकता. इथलं सौंदर्य तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल.
दक्षिण भारतातील हे गिरीस्थान तुमच्या सर्व चिंताच मिटवेल. तेसुद्धा इथं असणाऱ्या निसर्गसौंदर्याच्या मदतीनं.
गंगेच्या किनारी अध्यात्मिक अनुभूतीच्या शोधात तुम्ही या ठिकाणी पोहोचल्यानंतर इथं भान हरपून एकाग्र व्हाल ते म्हणजे येथील सकारात्मकतेशी.
राजवाडे, तलाव आणि त्याभोवती वसलेलं शहर म्हणजे उदयपूर. देशातील या शहरामध्ये तुम्हाला संस्कृतीचं एक वेगळं रुप पाहायला मिळेल.
गोवा म्हणजे फक्त पार्टी नव्हे, तर गोवा म्हणजे सुशेगाद आयुष्य. गोव्याचा प्रत्येक कोपरा तुम्हाला खऱ्या अर्थानं जगणं शिकवून जाईल.