जाणून घ्या

वाहनांच्या नंबर प्लेटवर IND का लिहिलेलं असतं? जाणून घ्या

Oct 28,2023

मोटर वाहन कायदा

ज्यावेळी एखाद्या वाहनाची खरेदी केली जाते, तेव्हा या वाहनांची नोंदणी मोटर वाहन कायद्याअंतर्गत केली जाणं गरजेचं आहे.

नंबर प्लेट

वाहनांच्या नंबर प्लेटवरून त्याची नोंदणी झाल्याचा क्रमांक आणि इतर तपशील लक्षात येतो. वाहनांच्या याच नंबर प्लेटवर IND ही अक्षरंही लिहिल्याचं आपल्याला आढळून येतं.

भारताचं संक्षिप्त रुप

IND म्हणजे भारताचं संक्षिप्त रुप आहे. अनेक वाहनांवर ही अक्षरं तुम्हाला होलोग्रामसह दिसतात. IND लिहिलेली वाहनं कादेशीररित्या नोंदणी झालेली असतात.

सुरक्षेचीच कारणं

IND असणारा क्रमांक RTO मधून नोंदणी केलेल्या वाहनांना दिला जातो. IND लिहिलेल्या वाहनांची नंबर प्लेट हाय सिक्योरिटी नंबर प्लेट असते. यामागं फक्त आणि फक्त सुरक्षेचीच कारणं आहेत.

अनेक सुविधा

उपलब्ध माहितीनुसार या नव्या नंबर प्लेटमध्ये टॅम्पर प्रूफ, स्नॅप लॉक सिस्टीम अशा अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

स्नॅप लॉक

मुख्य म्हणजे रस्त्यालगत असणारं कोणीही स्नॅप लॉकची नक्कल करू शकत नाही. ज्यामुळं वाहनचोरांपासून, दहशतवादी कारवाया किंवा तत्सम गोष्टींपासून तुमची वाहनं सुरक्षित ठेवते.

VIEW ALL

Read Next Story