भारतात दरवर्षी 19 फ्रेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. शिवरायांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या कथा तर प्रत्येकालाच थक्क करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच लढाया लढल्या आणि जिंकल्यासुद्धा. या यशामध्ये त्यांच्या अश्वाचादेखील मोलाचा वाटा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव 'विश्वास' असल्याचे बरेच इतिहासकार सांगतात. तर काहींचे वेगळे मत आहे.
शिवरायांच्या घोड्याचे नाव कृष्णा असल्याचे इतर इतिहासकारांचे मत आहे. तसेच, शिवरायांकडे बरेच घोडे असल्याची माहिती इतिहासात मिळते.
शिवरायांकडे बरेच घोडे होते आणि मोती, रणवीर, तुरंगी, गजरा आणि इंद्रायणी अशी त्यांची नावे होती.
शिवरायांकडे असलेल्या घोड्यांमध्ये डेक्कनी घोड्यांचा समावेश होता. हे घोडे आपल्या वेगासाठी ओळखले जात होते.
शिवरायांनी युद्धामध्ये भीमथडी घोड्यांचादेखील वापर केला. या घोड्यांच्या सहाय्याने त्यांना अनेक युद्ध जिंकता आली.