घातक विषाणूंच्या याल संपर्कात
तुम्हाला माहित आहे का, की फ्लाइटमध्ये काही गोष्टी इतक्या घाणेरड्या असतात की त्यांना स्पर्श केल्याने तुम्ही अनेक धोकादायक विषाणूंच्या संपर्कात येऊ शकता.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ट्रे टेबल हे फ्लाइटमधील सर्वात घाणेरडे जागा आहे. टॉयलेट फ्लश बटणापेक्षा ट्रे टेबलवर 8 पट जास्त बॅक्टेरिया आढळून येतात.
त्यानंतर फ्लाइटमधील तुमच्या सीटच्या मागील खिशाला कधी हात लावू नका. कारण ई. कोलायसह अनेक धोकादायक जीवाणू त्यावर आढळतात. कारण यात अनेक प्रवाशी गलिच्छ डायपर, टिश्यू किंवा रुमाल ठेवतात.
फ्लाइटच्या टॉयलेट लॉकलाही हात लावताना शंभर वेळा विचार करा. कारण अनेक जण शौच केल्यानंतर नीट हात स्वच्छ करत नाहीत आणि त्यानंतर ती लोक हाताने टॉयलेटच्या लॉकला स्पर्श करतात.
प्रत्येक व्यक्तीला फ्लाइट टेक ऑफ करण्यापूर्वी सीट बेल्ट बांधावा लागतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सीट बेल्टच्या बकल्सवर अनेक धोकादायक बॅक्टेरिया आढळतात.
आर्मरेस्ट ही अशी जागा जी देखील अत्यंत अस्वच्छ असते. कारण अनेक मुलं घाणेरडे हात किंवा पाय त्यांच्यावर ठेवतात.