अनेक महिलांबरोबर संबंध ठेवणाऱ्या शासकांबद्दल तुम्ही अनेकदा वाचलं असेल मात्र आज आपण एका अशा शासकासंदर्भात जाणून घेणार आहोत ज्याला पुरुषांचं आकर्षण होतं.
दिल्लीच्या तख्तावर राज्य करणाऱ्या अलाउद्दीन खिलजीसंदर्भातील अनेक गोष्टी आजही आवर्जून सांगितल्या जातात. या जणू दंतकथा झाल्यात.
एक क्रूर शासक असण्याबरोबरच अलाउद्दीन खिलजी त्याच्या कामवासनेसाठीही ओळखला जायचा.
महिलांबरोबर त्याला पुरुषांबद्दलही विशेष आकर्षण वाटायचं.
मलिक मोहम्मद जायसीच्या दाव्यानुसार अलाउद्दीन खिलजीला समलैंगिक संबंध ठेवायला आवडायचं.
अलाउद्दीन खिलजीला जो पुरुष आवडायचा तो त्याला गुलाम म्हणून ठेवून घ्यायचा आणि त्याच्याबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा.
अलाउद्दीन खिलजीच्या हरममध्ये महिला आणि पुरुषांबरोबरच तरुण मुलंही होती, असं सांगितलं जातं.
देश-विदेशातून आणलेली 55 हजार मुलं त्याने आपल्या लैंगिक वासना पूर्ण करण्यासाठी दास म्हणून वेगवेगळ्या महलांमध्ये ठेवल्याचं सांगितलं जातं.
अलाउद्दीन खिलजीच्या हरममध्ये 30 हजार सुंदर स्त्रिया होत्या.
अलाउद्दीन खिलजीच्या हरममधील बहुतांशी बायका या अशा होत्या ज्यांच्या पतीची खिलजीने हत्या केलेली असायची. पतीला ठार केल्यानंतर या महिलांना खिलजीच्या हराममध्ये आणून ठेवलं जायचं.
Disclaimer: येथील सर्व माहिती ही चर्चा, दंतकथांवर आधारित आहे. झी 24 तास डॉट कॉम याची पुष्टी करत नाही.