कोणत्याही रुग्णाचे ऑपरेशन करतावेळी रुग्ण हिरवे किंवा निळे कपडे घातलेले दिसतात.
सर्जनांनी हिरवे किंवा निळे कपडे परिधान करण्यामागे विशेष कारण आहे.
हिरवे किंवा निळे कपडे परिधान केल्याने सर्जनचा तणाव कमी होतो.
डॉक्टरांना अशा वेशात पाहून रुग्णांच्या नातेवाईकांचा ताण कमी होतो.
आधी डॉक्टर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे. मात्र यानंतर ड्रेसकोड बदलण्यात आला.
सर्जन्स ऑपरेशन थिएटरमध्ये जास्तवेळ असतात. अशावेळी रक्ताशी त्यांचा जास्त संबंध येतो.
रक्त पाहिल्यानंतर सफेद कपडे परिधान केलेल्या सर्जनला आपल्या स्टाफच्या सफेद कपड्यांऐवजी हिरवा रंग दिसू लागतो.
रंग भ्रमाच्या या घटनेला वैज्ञानिकदृष्ट्या 'व्हिज्युअल इलुजन' असे म्हणतात. यामध्ये सर्जनला हिरव्या रंगाची सावली दिसते.
ऑपरेशनवेळी लक्ष विचलित होऊ नये यासाठी सर्जनच्या ड्रेसचा पांढरा रंग बदलून हिरवा आणि निळा करण्यात आला.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)