आरबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता बँकेच्या UDGAM पोर्टलशी जवळपास 30 बँका जोडल्या गेल्या आहेत. जिथं आता कोणाचाही हक्क नसणाऱ्या रकमेची माहिती मिळणार आहे.
बँकेच्या या पोर्टलच्या माध्यमातून कोणाचाही दावा नसलेल्या रकमेची माहिती मिळवत आता त्या रकमेवर दावा सांगता येणार आहे.
एकाच ठिकाणी विविध बँकांमधील रकमेची माहिती इथं खातेधारकांना मिळणार आहे.
तुम्हीही काही वर्षांपूर्वी बँकेत ठराविक रक्कम ठेवून ती विसरला आहात? तर आता तुमची मदत होणार आहे.
आरबीआयच्या या पोर्टलवर एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सिटी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक अशा महत्त्वाच्या बँकांचा समावेश आहे.
आरबीआयच्या माहितीनुसार सरकारी बँकांमध्ये सध्या अशी 35000 कोटी रुपयांची कोणताही दावा नसणारी रक्कम होती.
ही रक्कम अशा खात्यांमधील होती, जिथं मागील 10 वर्षांपासून कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही. कोट्यवधींच्या या रकमेत तुमचा वाटा तर नाही? लगेच पाहा बँकेचं स्टेटमेंट.