रामजन्मभूमीला जाताय तर अयोध्येतील 'या' ठिकाणांना आवर्जुन भेट द्या

Jan 19,2024


अयोध्येत श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे.


अशावेळी तुम्ही जर अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर तेथे राम मंदिराशिवाय अनेक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकतात. अयोध्येत अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. चला या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.

देवकाली

देवकाली मातेचे मंदिर फैजाबाद शहरात अयोध्येपासून पश्चिम-दक्षिण दिशेला ५ किलोमीटर अंतरावर आहे. रामायणातही या मंदिराचा तपशील सापडतो. महाराज दशरथांनी बांधलेल्या मंदिरात माता गिरीजा देवीची मूर्ती घेऊन माता सीता अयोध्येत आल्याचे मानले जाते.

हनुमानगढ़ी मंदिर

भगवान रामाचे महान भक्त पवनपुत्र हनुमान यांना समर्पित हे मंदिर अयोध्या रेल्वे स्थानकापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर विक्रमादित्याने बांधले होते.

नागेश्वरनाथ मंदिर

राम की पायडी येथे भगवान शिवाला समर्पित हे मंदिर आहे. असे मानले जाते की, हे मंदिर भगवान श्री रामाचा धाकटा पुत्र कुश याने बांधले होते.

कनक भवन मंदिर

रामजन्मभूमीच्या ईशान्येला असलेले हे मंदिर कलाकृतीसाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की, माता कैकेयीने ही वास्तू भगवान श्री राम आणि माता सीता यांना भेट दिली होती.

बिर्ला मंदिर

अयोध्या फैजाबाद रस्त्यावर बिर्ला मंदिर अयोध्या बसस्थानकासमोर आहे. प्रभू राम आणि माता सीता यांना समर्पित यागा मंदिर नव्याने बांधले आहे.

राम की पडी

राम की पायडी हा सरयू नदीच्या काठावर वसलेला घाट आहे.

VIEW ALL

Read Next Story