उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवक असल्याचा फोटो शेअर केला.
मी कारसेवक असल्याचा मला अभिमान आहे, असे ते सांगतात.
राम मंदिरामुळे कारसेवक हा शब्द सध्या चर्चेत आलाय.
पण कारसेवक शब्दाचा नेमका अर्थ काय?
कारसेवा आणि कारसेवक हे शब्द राम मंदिर आंदोलनात महत्वाचे मानले जातात.
कारसेवक हा मूळ संस्कृत शब्द आहे.
यात 'कार'चा अर्थ कर म्हणजे हात आणि सेवक म्हणजे सेवा करणारे हात.
कारसेवक म्हणजे निस्वार्थ भावाने सेवा देणारे असा अर्थ येथे अभिप्रेत आहे.
इंग्रजीत याला वॉलिंटियर असे म्हटले जाते.