तुम्ही 100 रुपयांचे पेट्रोल गाडीत भरल्यास पंपवाले किती करतात कमाई?

Pravin Dabholkar
Feb 21,2025


पेट्रोल दर हा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारा विषय आहे. आजकाल बहुतांश जणांकडे गाड्या आहेत.


तसेच आपण जो भाजीपाला किंवा जिवनावश्यक वस्तू मागवतो, त्याही वाहनाने आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे पेट्रोल दरवाढीचा प्रत्येक नागरिकांवर परिणाम होत असतो.


पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन देशात मोठमोठ्या चर्चा होत असतात. पण याचे भारतातील दर वाढलेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते.


तुम्ही पेट्रोल भरल्यावर पेट्रोल पंपवाल्यांना किती फायदा होतो? त्यांची किती कमाई होते? याचा कधी विचार केलाय का?


पेट्रोलचे दर वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे असतात.


पेट्रोल पंपला मिळणारा कमिशन दर एकच असतो. ज्याप्रमाणे पेट्रोलचे दर शहराप्रमाणे वेगवेगळे असतात, त्याप्रमाणे वेगवेगळ्या शहरात पेट्रोल पंप मालकांची कमाई बदलते.


पेट्रोल पंप विकल्यानंतर पेट्रोल पंपची कमाई किती होते? तिथल्या संचालकांना प्रति लिटरच्या दराप्रमाणे कमिशन मिळतं. हाच त्यांचा प्रॉफीट असतो.


डिलर्सना पेट्रोलसाठी प्रति किलोलीटर 1 हजार 868.14 रुपये आणि डिझेलसाठी 1 हजार 389.35 रुपये कमिशन मिळते.


एक किलोलीटर म्हणजे 1 हजार लिटर पेट्रोल. या हिशोबाने 1 लिटरवर साधारण 2 रुपये कमिशन मिळते.


या हिशोबाने 100 रुपयांचे पेट्रोल विकल्यावर पंप मालकांना 2.5 रुपयांची कमाई होते. यावरुन पेट्रोलपंपवाले एका दिवसात किती कमाई करतात, याचा अंदाज तुम्ही लावू शकता.


तुम्ही एक लीटर पेट्रोलसाठी पैसे मोजता त्यात अर्धी किंमत टॅक्सची असते. या टॅक्समध्ये केंद्र आणि राज्याचा भाग वेगवेगळा असतो.

VIEW ALL

Read Next Story