प्रग्नेंन्सीमध्ये पिरियड्स उशीरा येतात. पण याशिवायदेखील याची अनेक कारणे आहेत.
अचानक वजन वाढतं, कमी होतं. याचा परिणाम पीरियड्सवर होतो.
तणावामुळे महिलांच्या शरिरातील हार्मोन्सचा स्तर गडबडतो.
थायरॉइड पातळी योग्य नसेल तर पीरियड्स उशीरा येण्याचे कारण ठरु शकते.
ज्या महिला आपल्या मुलांना ब्रेस्ट फिडिंग करतात, त्यांना पीरियड्स उशीरा येऊ शकतात.
पॉलिसिस्टिक्स ओवेरियन सिंड्रम म्हणजेच पीसीओएसची समस्या असलेल्यांना पीरियड्स उशीरा येऊ शकते.
खूप व्यायाम केल्याने पीरियड्सवर परिणाम होऊ शकतो.
गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्याने पीरियड्स उशीरा येऊ शकतात.