गुलाबजाम आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम आणि मिठाईचे फ्यूजन आहे. ही आईस्क्रीम सध्या चांगलीच ट्रेंडिगमध्ये आहे.
गुलाबजाम आईस्क्रीममध्ये एकाच वेळी दोन डेजर्ट टेस्ट करता येवू शकतात.
सध्या मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी गुलाबजाम आईस्क्रीम फ्लेवर लाँच केला आहे.
घरच्या घरी फक्त दोन पदार्थ वापरुन गुलाबजाम आईस्क्रीम बनवता येते.
यासाठी फक्त फ्रेश गुलाब जाम आणि व्हॅनिला आईस्क्रीम लागणार आहे.
फ्रेश गुलाबजामचे छोटे छोटे तुकडे करुन ते मेल्ट झालेल्या व्हॅनिला आईस्क्रीममध्ये मिक्स करावे.
या मिश्रणाला एका डब्यात भरुन त्यावर थोडे ड्रायफ्रूट टाकावे. यानंतर हे मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवावे.
तीन ते चार तासात गुलाबजाम आईस्क्रीम सेट होईल. तुम्ही लगेच या आईस्क्रीमचा आस्वाद घेवू शकता.