आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी घोषणा केली की, पर्यटन मंत्रालयाने २०२३ मधील भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन व्हिलेज म्हणून 'विश्वनाथ घाटाची' निवड केली आहे.
ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेल्या, विश्वनाथ घाटाला ‘गुप्त काशी’ म्हणूनही ओळखले जाते आणि प्राचीन विश्वनाथ मंदिराच्या नावावरून त्याचे नाव पडले आहे.हे गाव विश्वनाथ चारियाली शहराच्या दक्षिणेला आहे.
घाटावर विविध देवांची मंदिरे आहेत. याव्यतिरिक्त, ब्रह्मपुत्रेसह ब्रीधगंगा (बुरीगोंगा) नदीच्या संगमावर एक शिव मंदिर देखील वसलेले आहे.
पण आता फक्त त्याचे काही अवशेष उरले आहेत. उन्हाळ्यात हे मंदिर पाण्याखाली जाते. हिवाळ्यातच पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात आणि तात्पुरते शेड बांधून पूजा करतात.
हे धार्मिक स्थळ असले तरी, हिवाळ्यात विश्वनाथ घाट एक परिपूर्ण पर्यटन स्थळ बनते.
अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, ऑक्टोबर ते एप्रिल महिना भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. अनपेक्षित मुसळधार पावसामुळे दिवस खराब होऊ शकतो म्हणून पर्यटक पावसाळा टाळतात.
हिवाळा तापमान 12 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस असे आरामदायी असते.
विश्वनाथ शहरातील पर्यटकांसाठी काही प्रेक्षणीय स्थळांमध्ये विश्वनाथ मंदिर, नागशंकर मंदिर, मां कल्याणी मंदिर, ग्रीन आशियाना आयलंड रिसॉर्ट, नोमारा पिकनिक प्लेस, मोनाबारी टी इस्टेट आणि अर्थातच विश्वनाथ घाट यांचा समावेश होतो.